Friday, July 25, 2014

नव्वदीतलं भावविश्व...गाण्यांमधून जपलेलं.

90s Melodies अर्थात, नव्वदच्या दशकातील सुरेल गाणी, ही आजच्या 28 ते 40 वयोगटातील सर्व `तरुणांचा` जिव्हाळ्याचा विषय. या ब्लॉगमध्ये 1990 दशकाच्या पूर्वसंध्येला गाजलेल्या गाण्यांपासून 2000 सालच्या आरंभापर्यंत ज्या गाण्यांनी प्रत्येकाच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले, अशा गाण्यांना पुन्हा एकदा भेट आपण देणार आहोत. काय माहित, कोणतं गाणं कुणाच्या मनात अजून वसलेलं आहे...कोणते शब्द कुणाच्या मनाला अजूनही साद घालताहेत...कोणतं संगीत अजूनही संमोहित करतं आहे... नव्वदच्या दशकातील जादुई संगीताची मेजवानी या ब्लॉगच्या माध्यमातून आपण मिळवत राहू..जेव्हा-जेव्हा वाटेल तेव्हा. 

No comments:

Post a Comment